टीम मंगळवेढा टाईम्स ।
बसमध्ये प्रवासी प्रवास करीत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून, प्रवाशांची नजर चुकवून त्यांच्यासोबत असणाऱ्या लहान बाळाला दूध पाजण्याचा बहाणा करून पदर आडवा करून चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय महिलांना शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली.
दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रणिता मोरे या गावाकडून येण्यासाठी एस. टी. बसमध्ये बसल्या.
यावेळी एसटीमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या बॅगमधील छोट्या पर्समध्ये ठेवलेले ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काही स्त्रियांनी चोरून नेले.
तसेच कुमार दगडू टकले (रा. करकंब, ता. पंढरपूर) हे टेंभुर्णी ते पंढरपूर या एसटी बसने प्रवास करीत असताना ३ लाख ३५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग दोन्ही पायांच्या मध्ये घेऊन बसलेले होते.
ती रोकड असलेली बॅग कोणीतरी लबाडीने चोरून नेली होती. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम,
पोनि अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि चिमणाजी केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ नागेश कदम, राजेश गोसावी,
शरद कदम, सुरज हेंबाडे, सचिन इंगळे, सुनील बनसोडे, सचिन हेंबाडे, शोएब पठाण, दादा माने, राकेश लोहार, शहाजी मंडले व सायबर सेलचे पोकॉ अंदर आतार यांनी केली आहे.
कर्नाटकातही चोरीचे गुन्हे दाखल
पोलिसांनी तपास चक्रे फिरवत दीपाराधा रघू बलेशटर (वय २०) व ज्योती राम बलेशटर (वय २८, रा. बेतुड, जि. दावणगिरी, राज्य (कर्नाटक) या दोन्ही महिलांना अटक केली आहे. अटक केलेल्या महिला आरोपींवर कर्नाटक राज्यातदेखील याचप्रकारचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
त्या महिलांकडून ६८ हजार रुपयांची रोख रक्कम व ६ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स असा १ लाख ४ हजार रुपये किमतीचा चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज