टीम मंगळवेढा टाईम्स ।
आंधळगाव येथील एका बांधकामावर बेकायदा वाळू उपसा करून ती टाकताना पोलिसांनी पकडून बांधकाम मालक मारुती विश्वनाथ भिंगे (आंधळगाव) , धनाजी जानकर ( सांगोला ) व अज्ञात वाहनचालकाविरुद्ध वाळूचोरीचा व पर्यावरणाचा -हास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी पोलीस हवालदार प्रमोद मोरे यांच्यासह पोलीस हवालदार शेख , आंधळगावचे पोलीसपाटील व ग्रामसुरक्षा दलातील विठ्ठल माळी आदी गस्त घालत असताना आंधळगाव बसस्टॉपजवळ आले.
यावेळी खबऱ्यामार्फत मारुती भिंगे यांच्या बांधकामावर वाळूचा टिप्पर येणार असल्याची माहिती मिळाली.
तेथे पोलिसांनी सापळा लावला असता एक टिप्पर वाळू खाली करीत असताना दिसून आला. त्याचबरोबर दुसरी व्यक्ती एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसलेली होती.

पोलिसांना पाहताच चालकाने टिप्पर व स्कॉर्पिओ घेऊन वेगाने पलायन केले. याबाबत पोलीस हवालदार प्रमोद मोरे यांनी फिर्याद दिल्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













