मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी ते जुनोनी जाणार्या रोडजवळ एका जनावराच्या पत्रा शेडच्या आडोशाला गोलाकार बसून पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणार्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून
कामू कोळेकर (वय 42), राजेंद्र भोसले (वय 38), सुनिल चौगुले (वय 24), जकू जानकर(वय 64), जकू चौगुले (वय 33), कामू कोळी(वय 34), चन्नप्पा मरीआईवाले (वय 52),
दुर्योधन वाघमोडे (वय 32,रा.मेटकरवाडी), बंडु मरीआईवाले, शिवाजी टकले, दत्तात्रय चौगुले आदी अकरा जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची हकिकत अशी,खुपसंगी-जुनोनी रोडवरील शिवाजी टकले यांच्या जनावराच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम गोलाकार बसून पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची
गोपनीय माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने दि.11 रोजी छापा टाकला असता वरील 11 आरोपी गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी या छाप्यात रोख रक्कम,मोटर सायकली,मोबाईल असा एकूण 2 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपी बंडू मरीआईवाले, शिवाजी टकले,दत्तात्रय चौगुले हे मोकळया जागेचा फायदा घेवून पळून गेले असून अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज