मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे मन्ना नावाच्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोटर सायकली, मोबाईल असा एकूण 2 लाख 4 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून
समाधान विठ्ठल काळुंगे (वय 38), करण कालिदास कळसगोंडे (वय 24), विठ्ठल यशवंत काळुंगे (वय 70), लक्ष्मण आबा वाघमोडे (वय 60), मायाप्पा अंकुश माने (वय 38),
अंकुश रामा माने (वय 72),सर्व रा.कचरेवाडी, सुरेश जयवंत कट्टे (वय 55, मंगळवेढा) यांच्यासह सात जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, कचरेवाडी येथे दि.28 रोजी दिलीप मेटकरी यांच्या घराच्या समोर असलेल्या पाण्याचे कॅनलच्या बाजूस झाडाखाली सायंकाळी 6.30 वा. वरील
सर्व आरोपी एकत्र गोलाकार बसून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी सदर ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवून
छापा टाकला असता 52 पानाचा मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी रोख रक्कम व 5 मोटर सायकली,3 मोबाईल असा एकूण 2 लाख 4 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याचा अधिक तपास पोलिस नाईक विठ्ठल विभुते हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज