टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिलांना मारहाण केल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावचे पोलीस पाटील आणि इतर सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही तब्बल आठ दिवस उलटून गेले तरीही पोलीसांकडून कसलीही कारवाई केली केली नसल्याचे सांगत
फिर्यादी महिलेने सदर प्रकरणातील आरोपी पोलीस पाटील आणि तपासकामी असलेले पोलीस कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणे समोरच आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ९ जून रोजी फिर्यादी कमल वसंत खडतरे आणि मुलगा सुनील खडतरे आणि त्याची सासू शांताबाई बनसोडे हे त्यांच्या घरात सकाळी ८.३० वाजता चहा पित बसलेले असताना
ज्योतिबा रावसाहेब कांबळे, ज्योतिबा कांबळे यांची पत्नी, रावसाहेब साधूबा कांबळे, साखराबाई शंकर गवळी, जनाबाई शिवाजी गवळी,
राजु शिवाजी गवळी आणि अन्य एक अनोळखी महिला असे एकूण ७ जणांनी शेतामधील सामाईक बांधावरील दगडे का काढली असे म्हणत लाथाबुक्क्यांनी तसेच उसाने , दगडाने मारहाण केली.
तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचे मणीमंगळसूत्र गायब झाले आहे. या संबंधीची तक्रार मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज