टीम मंगळवेढा टाईम्स ।
सहावा दिवस मावळला तरी सरपंच जैतुनबी शेख (भाभी) यांचा शोध पोलिसांना नाही. अद्याप ठावठिकाणा लागला नाही, बुधवारपासून त्या अचानक बेपत्ता झाल्या.
सर्वत्र शोधूनही सापडत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली.
शेळ्या चारायला गेलेल्या कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या महिला सरपंच सलगर वस्ती पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पण, अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही. सरपंच भाभींना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
गावच्या सरंपचपदाची जबाबदारी पावणे पाच वर्षांपूर्वी जैतुनबी शेख यांच्या खांद्यावर आली. त्या शेळ्या बुधवारी (ता. ७ सप्टेंबर) सकाळी चारायला घेऊन गेल्या होत्या.
दुपारी बाराच्या सुमारास त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या पतीसह दोन मुलांनी त्यांचा शोध घेतला. नातेवाइकांकडे चौकशी केली. पण, त्या सापडल्या नसल्याचे नातलगांनी त्यांना सांगितले.
विहिरीत पडल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या विहिरीतील सगळे पाणी उपसले. पण, काहीच हाती लागले नाही. पती, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
मुलांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे फौजदार सचिन मंद्रूपकर यांनी जैतुनबी यांचा शोध सुरू केला. कुटुंबातील सदस्यांचे जबाब घेतले.
आठवडा, महिन्यापूर्वी कौटुंबीक कारणातून काही वादविवाद झाले होते का? गावातील कोणाशी भांडण झाले होते का? याचीही माहिती पोलिसांनी घेतली.
पण, पोलिसांना ठोस काहीच मिळाले नाही. बेपत्ता महिला सरपंच मोबाईल वापरत नव्हत्या, त्यामुळे तपासात पोलिसांच्या हाती आजपर्यंत तरी ठोस काही लागलेले नाही.
पोलिस वेगवेगळ्या बाजूंनी तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनीही त्यात लक्ष घातले आहे.
परिवाराने सर्वत्र घेतला शोध, तर्कवितर्कांना उधाण
सरपंच जैतुनबी भाभी अचानक बेपत्ता झाल्यामुळे कवठे परिसरात जादूटोणा किंवा भानामतीसारख्या अफवांनाही ऊत आला आहे. परिणामी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या गायब होण्यामागे नक्की कोणते कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परिणामी गावकऱ्यांमध्ये भीती पसरली असून सगळे चक्राऊन गेले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज