टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतीराम पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वैराग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलिसांमध्ये आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे.
माढा तालुक्यातील अंजनगावचे मूळ रहिवासी असलेले महेश पाडुळे (वय ४५) हे वैराग पोलिस ठाण्यामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंबासह वैराग येथे राहत होते. त्यानंतर त्यांची बदली सोलापूर मुख्यालय येथे झाली होती.
दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
त्यांना वैराग येथील वैराग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबतची खबर डॉ. सागर शिंदे यांनी पोलिसात दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक सहा वर्षांचा मुलगा, एक आठ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज