टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय सैन्यदलात भारत मातेची सेवा करणाऱ्या सर्व आजी-माजी जवानांना राजवीर सतीश दत्तू ह्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दि.१२ डिसेंबर पासून शिवप्रेमी चौकातील
हॉटेल आस्वादचा आरोग्यदायी चहा कायस्वरूपी मोफत मिळणार आहे.सदरच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उदघाटन माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व आजी माजी जवानांचे स्वागत करण्यात आले प्रत्येक सैनिक अर्थात जवान हे आपल्या देशाचे खरे देशसेवक आहेत ते देशासाठी लढतात एवढचं नाही,
तर आपले सर्वस्व अर्पण करतात अशा जवानांसाठी आपण काही तरी करावे या भावनेतून हॉटेल आस्वादचे मालक सतिश दत्तू यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसापासून सर्व आजी माजी सैनिंकासाठी कायमस्वरूपी मोफत चहा सुरु
करून जवानांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदर्श उभा केला आहे खरं तर मंगळवेढा तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्हयात आजी माजी सैनिंकाच्यासाठी प्रथमच हा आगळा वेगळा उपक्रम असुन
सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी माजी सैनिक संघटनेचे मल्लय्या स्वामी, मुबारक मुलाणी, चंगेजखान इनामदार, विनायक साळुंखे,आबाजी जाधव,महादेव दिवसे,दयानंद गायकवाड,बबन रोकडे,
कृष्णा पडवळे,मुरलीधर घुले,शंकर जाधव ज्ञानेश्वर रायबान,शिवानंद पाटील,बसन्ना एडके,हैदर इनामदार प्रकाश दिवसे,प्रकाश लिगाडे,याजीन इनामदार, शिवाजी दिवसे,सय्यद इनामदार,
बाळासाहेब पवार,आप्पासाहेब कोडक तसेच मुरलीधर दत्तू,ॲड.रमेश जोशी,अजित जगताप,शशिकांत चव्हाण,सोमनाथ आवताडे,प्रवीण खवतोडे,किसन सावंजी,अजित शिंदे,दऱ्याप्पा दत्तू,जनार्दन डोरले,सचिन शिंदे,
मुजम्मिल काझी,सोमनाथ बुरजे,मारुती दवले यांचेसह वारी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार प्रा.विनायक कलुबर्मे यांनी मानले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज