मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोशल मिडीयाच्या आभासी जगातल्या सर्वपक्षीय मित्रांची प्रत्यक्ष गळाभेट घडवून आणनाऱ्या पार्टी ट्रस्ट मित्र मेळाव्याचा मान सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
आज दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रामकृष्ण गार्डन व्हीला येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मित्रांचा गोतावळा एकत्र येणार आहे. ही सोशल मित्रपरिवाराची जत्रा म्हणजे सामाजिक, राजकीय व उद्योजकतेतील भूमिकांची वैचारीक मेजवाणी असणार आहे.
आपापल्या क्षेत्रात काम करत असतांना केवळ सोशल मिडीयावर बऱ्यापैकी अॅक्टीव्ह असणारे केवळ फेसबुक, ट्रिटर, इन्स्टापुरतेच मर्यादीत असतात. त्यांची विचारसरणी, बोलीभाषा त्यांचे कलागुण याची घालमेल प्रत्यक्षात व्हावी, नवनवीन मित्रांची प्रत्यक्ष गळाभेट व्हावी.
सततच्या व्यस्ततेतून बाहेर निघून निरनिराळ्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेत मनोरंजनाच्या दुनियेत मनमौजी व्हावे हा उदात्त हेतू या मित्रांच्या जत्रेच आहे.
यावर्षीच्या कार्यक्रमात सोलापूर लेझीम, लावणी नृत्य, एकपात्री विनोद अशा सांस्कृतीक कार्यक्रमासोबतच खान्देशातील मानदेशी खाद्यभोजनाची मेजवाणी असणार आहे.
सकाळच्या सत्रात पार्टी ट्रस्ट ला मदत करणाऱ्या सत्कारमूर्तीचा सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर विविध सांस्कृतीक, वैचारीक व मनोरंजनपर कार्यक्रम योजिले आहेत. पार्टी ट्रस्टने यंदा ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली आहे. ज्या मित्रांना नोंदणी करावयाची आहे, त्यांनी संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन पार्टी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सांगोला येथील ट्रस्टचे पदाधिकारी प्रदिप मिसाळ, राजू शिंदे, मल्हारराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज