टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या तीन नेत्यांनी काल एकत्रितरित्या बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
या नेत्यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आता यातील तिघांपैकी उमेदवारी लॉटरी नेमकी कोणाला लागणार की नवीन चेहरा समोर येणार, याची उत्सुकता आहे.
शरद पवार यांना भेटलेल्या नेत्यांमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरची माजी उपनरागध्यक्ष नागेश भोसले, काही दिवसांपूर्वीच पांडुरंग परिवारातून बाहेर पडलेले वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे. आणखी एका परिचारक समर्थकाने पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, पंढरपूरचे माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, मोहिते पाटील समर्थक वसंत देशमुख, काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकर, मंगळवेढ्याचे प्रथमेश पाटील यांनी काल बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे.
तसेच, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूपंत शिंदे, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, पंढरपूर मंगळेवढा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर कौवठाळे,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभरी, मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष रंधवे हे मंगळवेढ्यातील नेतेही उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकाच वेळी भेट घेतल्याने पंढरपूर मंगळवेढ्याचा उमेदवारीचा निर्णय झाला की काय, अशी चर्चा आता रंगली आहे.
नागेश भोसले हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती, त्यामुळे पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, याची उत्सुकता आहे.
उमेदवारीसाठी अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत, त्यामुळे पंढरपुरात तुतारीची उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनीही पंढरपूर-मंगळेवढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे.
तसेच, वसंतराव देशमुख यांनीही तुतारीकडून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुतारी नेमकी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या भेटीचा तपशील समजू शकला नसला तरी या सर्व नेत्यांशी पवारांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. आता शरद पवार यातील कोणाला उमेदवारी देणार की ऐनवेळी नवीन चेहरा पुढे आणणार, याबाबत औत्सुक्य आहे.
मोहिते पाटलांची भूमिका ठरणार महत्वाची
या भेटीवेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही उपस्थित होते. माढा मतदारसंघातील उमेदवार ठरवताना मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे एका नावावर एकमत करण्याचा मोहिते पाटील यांचा प्रयत्न असल्याचे कालच्या बैठकीतून दिसून येत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज