टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे होता आणि भविष्यात राहील या यासंदर्भातील निर्णय हा खा.शरद पवार व महाविकास आघाडीचे मुख्य नेते घेतील असे प्रतिपादन खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. अनिल सावंत यांच्या नामनिर्देशन पत्राला तुतारीचा एबी फॉर्म जोडण्यासाठी खा. धैर्यशील मोहिते-पाटील हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी पंढरपूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल शहा, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील,
पंढरपूर-मंगळवेढा कार्याध्यक्ष संतोष रंधवे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे जिल्हा उपप्रमुख सुधीरभाऊ अभंगराव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख महावीरनाना देशमुख, श्याम गोगाव, कृष्णदेव लोंढे, पंढरपूर शहर उपप्रमुख तानाजी मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अनिल सावंत यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज त्यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ए.बी. फॉर्म घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माध्यमांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पारंपारिक पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे निश्चित या मतदार संघातून तुतारीचाच उमेदवार विजयी होईल.
महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार उभा राहील, इतरांना सांगण्या इतका मी मोठा नाही. महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते निश्चित योग्य तो निर्णय घेतील.
अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याविषयी कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमात होती. त्यातच काँग्रेसने शरद पवारांना विचारात न घेता या मतदार संघातून भगीरथ भालके यांना उमेदवार जाहीर केली.
या मतदार संघाची जागा यापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे होती. त्यामुळे पारंपरिक या मतदार संघातून राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवेल, असं चित्र होतं. मात्र अचानक काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने, या मतदार संघात आणखीन पेच निर्माण झाला. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अनिल सावंतांना मैदानात उतरल्याने काँग्रेसपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज