mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अधिकाऱ्यांनो! घर, शेती, फळबागांचे अतोनात नुकसान, मतदारसंघातील नुकसानग्रस्त घरांचे व पिकांचे त्वरित पंचनामे करावेत; आ.आवताडे यांच्या सर्व विभागाला सूचना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 27, 2024
in मंगळवेढा
वादळी वार्‍यामुळे मंगळवेढ्यात चार घरावरील पत्रे गेले उडून; गाेर गरीबाचा संसार आला उघड्यावर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या पिकांचे तसेच अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी राहत्या घरांचे छत व पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी

अशा सूचना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी, महावितरण उपभियंता व इतर प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांना दिल्या आहेत.

दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड देत असलेल्या मतदारसंघातील अनेक गावांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे.

या पावसामुळे केळी, डाळिंब, आंबा आधी फळबागांचे व शेतकऱ्यांच्या घराचे, लाईट पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अनेक शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करत होते.

मात्र, काल व त्याअगोदर काही दिवसांपूर्वी मतदारसंघातील अनेक गावात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नामोहरम केले असून शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तसेच अनेकांचे राहते घर कोसळून हक्काचा निवाराही निसर्गाने हिरावून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी विविध नुकसानग्रस्त गावातील घरांना भेटी देऊन आढावा घेतला होता.

दरम्यान मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या सर्व नुकसानग्रस्त बाबींचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी त्वरित पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करून त्याचे अहवाल नुकसानग्रस्त भरपाई साठी शासन दरबारी सादर करावेत अशा सूचनाही आमदार आवताडे यांनी दिल्या आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
Next Post
थरार नाटय! मंगळवेढा शहरातील भर चौकात एकावर खुनीहल्ल्या प्रकरणी आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

तरुणांनो सावधान! बनावट नवरीशी लग्न लावून देणाऱ्या टोळीला डमी नवरा उभा करून पकडले; अनेक नवरदेवाला फसविले

ताज्या बातम्या

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..