टीम मंगळवेढा टाईम्स ।
‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी ३१ मार्च शेवटचा दिवस होता. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून चालढकल करणाऱ्या लाखो नागरिकांनी आज अखेरच्या दिवशी आयकर विभागाच्या वेबसाईटवर एकाच वेळी लॉगिन केल्याने साईट क्रॅश होऊन उघडतच नसल्याचं चित्र पहायला मिळत होतं.
मात्र, आता ज्यांचं आधारी कार्ड पॅन कार्डशी लिंक होऊ शकलेलंच नाहीये, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२१ ची शेवटची मुदत आता आणखी वाढवली आहे.
तीन महिन्यांनी या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून ती आता ३० जून २०२१ करण्यात आली आहे. याआधी, ३१ मार्च २०२१ आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आयकर कायद्यान्वये एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा आणि पॅन कार्ड रद्दची कारवाईही देखील होऊ शकणार होती.
त्यासाठी सरकारने यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, लाखो नागरिकांनी एकाच वेळी यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट दिल्याने आज अखेरच्या दिवशी आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली होती.
त्यामुळे अनेकांनी यासंदर्भात सोशल मीडियामुळे तक्रार करत या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ही मागणी आता मान्य करण्यात आली असून मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
थेट पंतप्रधान अर्थमंत्र्यांना मागणी
आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात बातम्याही दिल्या जात होत्या.
मात्र तरीदेखील अनेकांनी लिंक केले नसल्याने आजच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या आयकर विभागाच्या वेबसाईटवर उड्या पडल्या होत्या. मात्र, त्यामुळे साईट क्रॅश होऊन बंद पडली होती.
अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसं करायचं असा प्रश्न सरकारी यंत्रणांना विचारला होता. तर काहींनी आधार पॅन लिंक करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी थेट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना ट्विटरद्वारे केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज