टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेचे पक्षनेते तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित रामचंद्र जगताप यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज दि.1 ऑक्टोबर रोजी विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी ९.३० वाजता सोलापूर रोडवरील स्पर्धा परीक्षा केंद्र , नगरपालिका शाळा नंबर 4 येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सकाळी 10 वाजता श्रीराम मंगल कार्यालय येथे महिलांचे आरोग्य शिबिर आयोजित केले असून यात हिमोग्लोबिन तपासणी, औषध वाटप,नेत्र तपासणी बरोबर चेष्मे वाटप सुद्धा करण्यात येणार आहेत.
त्यानंतर सकाळी 11 वा.श्रीराम मंगल कार्यालयात एसटी महामंडळ यांच्या वतीने 65 वर्षीवरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी.
या योजने अंतर्गत 4 हजार किलोमीटर प्रवास निशुल्क करण्यात येणार आहे. तसेच आधाराची काठी व मोफलर दिले जाणार आहेत.
सायंकाळी 6 वाजता अपंग व्यक्तींसाठी तीन चाकी सायकल, वॉकर, कुबडी, सॅनिटाझर वाटप त्याचबरोबर नगरपालिका सफाई कामगारांना स्वेटर व मफलर वाटप देखील करण्यात येणार आहे.
या समाजउपयोगी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अजित जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज