टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे उद्या शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० वा. माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंद्रिय शेती शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती अँड.भारत पवार व हरिभाऊ यादव यांनी पत्रकारांना दिली.
महाऑरगॅनिक अँड रेश्यूड्युफ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फाच्या वतीने मंगळवेढा येथे शुक्रवार दि १९ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,
मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची कार्यशाळा सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट, गोपनबाई विहिरी समोर, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्यभर सेंद्रिय शेतीमध्ये वाढ होत आहे. पण सेंद्रिय शेती उत्पादनांना शाश्वत मार्केट मिळत नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेती बाबत खुष नाहीत. तसेच महाराष्ट्रातील जमिनीची सुपीकता संपत चाललेली असून जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमालीचा घटत आहे.
जमिनीचे आरोग्य चिंताजनक अवस्थेत आहे. नागरिकांनाही सेंद्रिय व विषमुक्त शेती उत्पादने मिळत नसल्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहे.
यासाठी शेतकरी व ग्राहक यांचा समन्वय करून सेंद्रिय शेती उत्पादनांना चांगले मार्केट मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे ऍड पवार व यादव यांनी सांगितले.
तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन सुदर्शना आनंद लोकरे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज