मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
शासनाच्या वाळू धोरणानुसार भीमा नदीच्या पात्रात सहा ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांवरून वाळू उपसा करण्यासाठी फक्त तीन निविदा आल्या आहेत. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाने मुदतवाढ दिली असून आता १६ जून रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत.
आपत्ती धोरणानुसार भीमा नदीच्या पात्रातील पाच ठिकाणी होणाऱ्या उपशाबाबतची निविदा ९ जून रोजी खुली होणार होती.
जिल्हा खनिकर्म विभागातर्फे शुक्रवारी ऑनलाइन निविदा खुल्या केल्या. मात्र त्यामध्ये सहा ठिकाणच्या जागांसाठी फक्त तीन निविदा आल्या होत्या. ठेके सहा मात्र निविदा तीन असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही केली नाही. निविदा प्राप्त होण्यासाठी पुन्हा १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १६ जून रोजी निविदा उघडण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण राज्यासाठी शासनाचे वाळू धोरण जाहीर केले आहे. सर्वसामान्य लोकांना ६०० रुपये ब्रास वाळू मिळाली पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर आखले आहे. ठेवून धोरण आखले आहे. अहमदनगर व नाशिकमध्ये याची अंमलबजावणी झाली आहे. मात्र, सोलापूरच्या वाळू बाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
महसूल व वन विभागाने शासनामार्फत वाळू व रेती उत्खनन साठवणूक, ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्रीचे धोरण धोरणानुसार आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये म्हणून ज्या नदीपात्रात गाळाचे संचयन झाले आहे, अशा ठिकाणी उत्खनन होणार आहे.
या ठिकाणी होणार उत्खनन
■ सोलापूर जिल्ह्यातील नदीपात्रातील पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. वाफेगाव (ता. करमाळा), उंबरे (वे), जांभूड (ता. माढा), गुरसाळे, चळे (ता. पंढरपूर),
उचेठाण (ता. मंगळवेढा) या ठिकाणच्या नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचे ठरले आहे. याबाबत पर्यावरण विभागाचीही परवानगी घेण्यात आली आहे. उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाइन निविदा मागविण्यात आली होती, त्यात मुदतवाढ दिली आहे.(स्रोत;लोकमत)
निविदा न आल्यामुळे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. १६ जून रोजी निविदा उघडल्या जातील व त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल.- दिव्या वर्मा, जिल्हा खनिकर्म अधिकारी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज