टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक, आठवडी बाजारात आज दुपारी 4.30 वाजता मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होणार असून, लाखो समाजबांधव सभेला जमणार असल्याची माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली.
सकल मराठा समाजातर्फे मंगळवेढा तालुक्यात सलग एक आठवडाभर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी त्यांना जनसमुदाय पाठिंबा देत आहे.
त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातही तितक्याच ताकतीची विराट सभा व्हावी, म्हणून तालुका सकल मराठा समाजातर्फे प्रत्येक गावांत सभेचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
सभेसाठी मंगळवेढा, सांगोला व पंढरपूर तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित असणार असल्याची माहितीही देण्यात आली. सभेसाठी अंदाजे १ लाखापेक्षा जास्त जनसमुदाय येऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
पार्किंग, बैठक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले गेले आहे. प्रत्येक गावातील प्रमुखांसह समाजाचे काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन सभेची जोरदार तयारी सुरू आहे. जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे
मराठा आरक्षणावर घटनात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने ४० दिवसांचा वेळ मागून घेऊन मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती सरकारने केली होती. त्याप्रमाणे त्यांनी उपोषण सोडले, त्यानंतर वैद्यकीय उपचार घेऊन ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
मराठा समाजाचा आरक्षण लढा आता योग्य मार्गावर चालू असून, फक्त राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे निर्णय होत नाही म्हणून या राजकीय इच्छाशक्तीला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी भाग पडणारी रणनीती ठरणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
महाराष्ट्रात ३५ टक्क्याच्या वर मराठा समाज असूनदेखील आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवल्याची भावना समाजात आहे.
त्यामुळे आज होणाऱ्या विराट सभेस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज