मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आश्वासन देऊन दोन आठवडे पूर्ण झाले तरी राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळेच आता १५ फेब्रुवारीपासून गावागावात साखळी उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. हे उपोषण बेमुदत स्वरूपाचे असणार आहे.
दररोज एक गाव आंतरवालीतही येऊन उपोषण करणार आहे. तरीही सरकारने दखल घेतली नाही तर मराठे पुन्हा मुंबई गाठतील. येत्या दोन-तीन दिवसांत मैदान पाहण्यासाठी मुंबईला जाण्यासंदर्भात घोषणा करू.
आता मुंबईत गेलो तर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तेथून हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी शनिवारी दिला.
जरांगे यांनी शनिवारी सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारने आम्हाला आश्वासन दिले, त्यावर काहीच कार्यवाही नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांचा केला एकेरी उल्लेख
यापत्रकार परिषदेत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीका केली. फडणवीस त्यांची चाल सोडायला तयार नाहीत, ते मराठाद्वेषी आणि जातीयवादाने पछाडलेला माणूस आहे. पदाची गरिमा राखायची असेल तर जनतेची
इज्जत राखणे शिका, तरच तुम्ही राजा. आमच्या लेकराचे मुडदे पडलेत, तुम्ही कशाचे राज्याचे प्रमुख, असा सवाल जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. आतापर्यंत सन्मान दिला, पण आता तुम्ही केसेस मागे घेण्याऐवजी उकरून काढत आहात, असे जरांगे म्हणाले.
पोलिस अधिकाऱ्यांवर टीका
अंबडचा पोलिस अधिकारी मराठ्यांची लेकरं केसेसमध्ये अडकवत आहे. तू आमच्या कचाट्यात आला तर मग तुला बघू. गोरगरिबांची लेकरं अडकवू नका. अधिकाऱ्यांनी नेत्यांचे ऐकू नये, व्यवस्थित काम करावे, असे म्हणत जरांगे यांनी पोलिसांवर टीका केली. मात्र जरांगे यांनी कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेतले नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज