टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात कोरोनाचा उपप्रकार जेएन.१ चा आतापर्यंत एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाची लक्षणे आणि जेएन.१ उपप्रकाराबाबत इतर बाबी तपासल्या जात आहेत. याबाबत पुढील ४८ तासांत सरकारला अहवाल मिळेल.
त्यानंतर हा उपप्रकार किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
याचबरोबर करोनाच्या वाढलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कृती पथकाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी केली.
आरोग्यमंत्री सावंत यांनी राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.
केरळमध्ये जेएन.१ आढळून आल्यानंतर लगेचच आम्ही मॉक ड्रीलचे नियोजन केले होते. त्यानुसार १७ व १८ डिसेंबरला राज्यभरात आरोग्य व्यवस्थांचे मॉक ड्रील झाले.
त्यात आरोग्य व्यवस्थेची सज्जता, साधनसामग्री, रुग्णालयातील खाटा यासह इतर बाबींचा आढावा घेण्यात आला. याचबरोबर पूर्वतयारीची पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जेएन.१ उपप्रकार पहिल्यांदा केरळमध्ये आढळून आला. केरळमधील अहवाल आम्हाला मिळाला आहे. तिथे मृत्यू झालेल्या तीन रुग्णांपैकी दोघांना इतर आजार होते. तसेच त्यांचा वयोगट ७५ वर्षांपुढील होता. हा उपप्रकार धोकादायक नसून सौम्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी
राज्यात सिंधुदुर्गमध्ये जेएन.१ चा एकमेव रुग्ण सापडला आहे. त्याला कुठून संसर्ग झाला याची तपासणी केली जात आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. या रुग्णाची लक्षणे आणि इतर बाबींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
त्याचा अहवाल ४८ तासांत सरकारला मिळेल. हा अहवाल मिळाल्यानंतर हा उपप्रकार किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होईल. सध्या करोनाचा संसर्ग वाढत असता तरी तो घातक स्वरुपाचा नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे.
आता सुट्यांचा काळ आहे. त्यामुळे अनेक जण पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करीत आहेत. सहलीसाठी जाताना नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. याचबरोबर सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दीत शक्यतो मास्कचा वापर करावा. – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज