टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द येथे शेतातील बांधावर दगड रोवल्याच्या कारणावरून चौघांनी विळ्याने दयानंद कोळी याच्यावर हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी
बाळासो काटकर, संतोष काटकर, कोंडीबा काटकर, जालिंदर काटकर, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती यातील जखमी फिर्यादी दयानंद कोळी त्यांना दिनांक ११ रोजी सकाळी ९ .३० वाजता सलगर खुर्द येथे वरील आरोपीने शेताच्या बांधावर दगड रोवल्याच्या कारणावरून
विळ्याने मांडीवर मारून गंभीर जखमी करून शिवीगाळ दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
जनावरे शेतात का सोडले म्हणाल्यावरून मारहाण
बेलाटी परिसरात शेतात जनावरे का सोडले अशी विचारणा केल्यावर चारजणांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण करून जखमी केले.
श्रीशैल विश्वनाथ कांबळे ( वय ३२ , रा.९ ६ / ९ ७ , शुक्रवार पेठ सोलापूर ) यांचे बेलाटी परिसरात शेतजमीन असून त्या शेतात जनावरे का सोडले असे विचारल्यावरून
सुधीर संभाजी वाघमारे , नागेश मारूती वाघमारे , मारूती वाघमारे , संभाजी वाघमारे या सर्वजणांनी मिळून बैलगाडीचे लोखंडी खिळे काढून मारहाण केले आणि शिवीगाळ दमदाटी करून दगडाने मारून जखमी केले अशी फिर्याद
श्रीशैल कांबळे याने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास हवालदार यलगुलवार करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज