टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर येथील शांतता रॅलीला मंगळवेढा येथील एक लाख मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाज मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात आली आहे.
येत्या 7 ऑगस्टला मराठा समाजातील प्रत्येक गावातून सर्व महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज मंगळवेढ्यात सकल मराठा समाजाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी सोलापूर येथे मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवण्यासाठी शांतता रॅली काढण्यात येणार आहे. लवकरात लवकर सगे सोयरेचा अध्यादेश काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी मंगळवेढा मधील मराठा समाज बांधवांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती दि.7 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे.
सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांचं भाषण होणार आहे.

लोकसभेला मराठा समाजामुळे सत्ताधारी पक्षाचे नुकसान झाले आहे आता त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेला मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती माऊली पवार यांनी दिली.
याप्रसंगी सोलापूर सकल मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम बरडे, माऊली पवार, बबनराव आवताडे, विनोद भोसले, भोसले सर, महेश पवार, देशमुख आदीजन उपस्थित होते.
मराठा समाजातील सर्व व्यावसायिक, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी स्वयंस्फूर्तीने शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र कोणताही राजकीय पक्ष त्याचे नाव, चिन्ह, पद बाजूला ठेवून एक मराठा सेवक म्हणून समाजासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी नगरसेवक आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी देखील सहभागी व्हावे अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे.
भव्य रक्तदान शिबीर
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि.1 ऑगस्ट रोजी मूढवी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे असे बबन रोकडे मेजर यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











