mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 11, 2025
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक, सोलापूर
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सूर्योदय अर्बन महिला को-ऑफ क्रेडिट सोसायटी व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून दि.18 जूनपर्यंत आरडी सप्ताह सुरू केल्याची माहिती बँकेच्या प्रशासनाने दिली आहे.

आजपासून नागरिकांनी सूर्योदय अर्बन महिला को-ऑफ क्रेडिट सोसायटी व एल.के.पी मल्टिस्टेट या दोन्ही पैकी एका बँकेत अथवा दोन्ही बँकेत 1 हजारांची RD सुरू केल्यानंतर त्यांना 2 ग्रॅम चांदीचे नाणं अगदी मोफत देण्यात येणार आहे.

उद्योगविश्वातील योद्धा.... अनिलभाऊ इंगवले

यशस्वी माणसं वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ती प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने  करतात. आणि त्या वेगळेपणाची चुणूक हाती घेतलेल्या प्रत्येक कामात दाखवतात.

‘सूर्योदय उद्योग समूहातील’ प्रत्येक उद्योग आणि व्यवसायांवरती आपल्या कार्यकुशलतेचा व कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे, स्वतः शंभर पावले पुढे टाकण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन एक एक पाऊल पुढे टाकण्यात आनंद मानणारे, आधुनिक  विचारांचे प्रगल्भ नेते म्हणजे अनिलभाऊ इंगवले.

संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मिळून लाखो समाधानी ग्राहक असलेल्या, हजारो सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणाऱ्या आणि शेकडो तरुणांच्या हाताला काम देत मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती करणाऱ्या ‘सूर्योदय उद्योग समूहाचे’ संस्थापक त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात मिळून

सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाच्या सुमारे 200 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी चे चेअरमन, चळवळीचा पिंड असलेले अभ्यासु व्यक्तिमत्व व आमचे परममित्र माननीय अनिलभाऊंचा आज वाढदिवस.

आपल्या मागे किती जण उभे आहेत, यापेक्षा आपण किती जणांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू शकतो, याचाच सतत ध्यास घेत मराठी माणूस उद्योग आणि व्यवसायात पुढे जायला हवा.  हा विचार करत परिसरातील कितीतरी छोट्या-मोठ्या व्यवसायिक आणि उद्योजकांच्या पाठीशी अनिलभाऊ  स्वतःच्या विचारांची शक्ती उभे करतात.

ना पैसा बडा , ना पद बडा, मुसिबत मे जो साथ खडा, वो सबसे बडा. अकरा जून 1981 रोजी मेडशिंगी येथील बुरलेवाडी सारख्या छोट्याशा वस्तीवर शेतकरी कुटुंबात जन्म.

जात्यावरच्या  ओविंपासून अनेक प्रकारच्या ग्रामीण लोकगीतांचा वारसा जपणाऱ्या समर्थभक्त सौ शालनताई इंगवले या माता आणि शेळ्या मेंढ्यांपासून सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांवर दया करत मनापासून काळया आईची मशागत करणाऱ्या कुबेरभाऊ इंगवले सारख्या पित्याच्या पोटी जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीत देखील समाजसेवा, लोक चळवळ आणि सतत नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याची उमेद कायम जोपासली.

अनुकूल आणि प्रतिकूल अशा कोणत्याही परिस्थितीत कायम साथ देणाऱ्या सुविद्य पत्नी सौ अर्चनाताई , मुलगा ओमराजे आणि गुणवंत व उच्चशिक्षित मुलगी डॉ यशश्री ही कौटुंबिक पार्श्वभूमी.

स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची ताकद बनवतात. ते आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत,  हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले.      आयुष्यात काही वादळ आपणास विचलित करण्यासाठी नव्हे तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात . असा अत्यंत सकारात्मक विचार करत आयुष्यातील कितीतरी आव्हानांना ते पुरून उरले आहेत.

सुरुवातीच्या कालखंडामध्ये ट्रॅव्हल्स पावती बुकिंग करणे , स्वतःच स्थापन केलेल्या पतसंस्थेमध्ये सचिव म्हणून काम करणे, हॉटेल व्यवसाय असो, खते बी बियाणांचे दुकान असो, बी बियाण्यांच्या  कंपनीमध्ये मार्केटिंगची नोकरी असो तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, साखर कारखान्यातील छोटी छोटी कामाची टेंडर घेणे अशी कितीतरी कामे नि :संकोचपणे ते करत राहिले.

काम लहान असो की मोठे प्रत्येक कामात त्यांच्या बुद्धी कौशल्याची चूनुक दिसून येते.                           माझी आणि अनिलभाऊंची सुमारे 25 वर्षापासूनची घट्ट मैत्री आहे. त्यांच्या आयुष्यातील कितीतरी बऱ्या वाईट प्रसंगांचा मी जवळचा साक्षीदार आहे .जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते तेव्हा देखील आणि आजही अफाट कष्टाची कोणत्याही वेळी तयारी असणारा त्यांचा स्वभाव अतिशय कौतुकास्पद आहे.

ज्यांच्याजवळ उमेद आहे, तो कधीच हारू शकत नाही.  सन 2010 साली त्यांनी मला तसेच डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजींना सोबत घेऊन मेडशिंगी या ठिकाणी ‘सूर्योदय गोल्ड फायनान्स’ नावाचे पहिले युनिट उभे केले. बघता बघता ‘सूर्योदय महिला बचत गट’,  ‘पुरुष बचत गट’,  ‘निधी कंपनी’, ‘सूर्योदय अर्बन’,  ‘सूर्योदय महिला अर्बन’ , कापड उद्योग, मोबाईल शोरूम, ज्वेलर्स आणि एल के पी मल्टीस्टेट अशा अनेक संस्था आणि उद्योगांच्या प्रवासात एका छोट्याशा युनिटचे विशाल अशा औद्योगिक वटवृक्षात रुपांतर झाले.

आज सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडत महाराष्ट्रभर किंबहुना कर्नाटक राज्यांपर्यंत विविध उद्योगांच्या माध्यमातून ‘सूर्योदय उद्योग समूह’ कार्यरत आहे.

माननीय अनिलभाऊंच्या कुशल नेतृत्वाखाली आणि सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक डॉ बंडोपंत लवटे यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली ‘सूर्योदय दूध विभाग’  अतिशय सक्षमपणे वाटचाल करत आहे.

कोणतेही काम बोल घेवड्या बातांनी नव्हे तर कर्तुत्व संपन्न हातांनी फत्ते होते.  सूर्योदय उद्योग समूहातील प्रत्येक संस्था आणि उद्योगात अनिलभाऊंच्या कुशल कार्यकर्तुत्वाची छाप उमटलेली आहे.

भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरांमध्ये सूर्योदय वस्त्रनिकेतन, फर्निचर आणि बझार अशा सर्व बाबींनी सुसज्ज असलेले सुमारे 42 हजार स्क्वेअर फुटाचे, सांगोला शहर आणि तालुक्याच्या वैभवात मोलाची भर घालणारे ‘सूर्योदय मॉल’  हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे खरेदी दालन आपली सेवा देत आहे.

संस्था, व्यवसाय आणि उद्योगांची ‘गगनभरारी’  एका बाजूला सुरु असताना सूर्योदय सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आजवर कितीतरी मनोरंजन आणि प्रबोधनाचे उपक्रम घेतलेले आहेत. त्याचबरोबर सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवंतांचे सन्मान, वृक्षारोपण, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, समाजासाठी अत्यंत उपयुक्त अशी रक्तदान शिबिरे , दिंडी , सप्ताह आणि विविध मंडळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ‘अन्नदान सेवा’ ग्रामीण भागातील भाविकांना तीर्थयात्रा दर्शन, जलसंधारण अशा कितीतरी उपक्रमांद्वारे लोकोपयोगी समाजकार्याचा डोंगर उभा करणारा सूर्योदय परिवार.

या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध क्षेत्रातील नामवंत अशा हजारोंचा मित्रसंग्रह जोडणारा हा व असाधारण असामी. जी  माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही . इतरांच्या समाधान व आनंदासाठी सदैव झटणारा सदाहरित नेता म्हणजे अनिलभाऊ.

सूर्योदय उद्योग समूहातील प्रत्येक घटकांवर स्वतःच्या नेतृत्वाची छत्रछाया कायम राखत महाराष्ट्रातील एक नामवंत वित्तीय संस्था एल के पी मल्टीस्टेट आणि सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत आर्थिक संस्था सूर्योदय अर्बन या दोन संस्थांचा आव्हानात्मक डोलारा लीलया पेलणारा कणखर नेता,  स्वतःच्या समर्थ अशा दोन्ही हातामध्ये ‘ आयुध’ घेऊन एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर पराक्रम गाजवणाऱ्या इतिहासातील एखाद्या सम्राटासारखा …..

सहकारातील आणि उद्योगविश्वातील योद्धा…..  अनिलभाऊंना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा..- जगन्नाथ भगत गुरुजी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल इंगवलेसांगोला

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
दुर्दैवी घटना! घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

खळबळ! प्रियकरासोबत मुलगी पसार, आई-वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं; पंगतीही उठल्या, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनल लावला

October 12, 2025
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

सभासदांनो! दामाजी कारखान्याची दिवाळी सणाच्या साखरेचे वाटप ‘या’ दिवसापासून सुरू होणार; चेअरमन शिवानंद पाटील यांची घोषणा

October 11, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा महिलाराज येणार; प्रश्नांची जाण असलेल्या महिलेचा शोध घ्यावा लागणार; पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

October 11, 2025
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; वटपौर्णिमेच्या दिवशीच विहिरीत आढळला मृतदेह

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..