टीम मंगळवेढा टाईम्स ।
आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
मंगळवेढ्यात कॉलिटीबाज चॉकलेट पान, ऑरेंज पान, पायनापल पान, मसाला पान आदी प्रकारचे सर्व पाने एकाच ठिकाणी मिळत आहेत.
रतनचंद शहा बॅंकेसमोर असलेले किरण माने यांचे मित्रप्रेम पान शॉपमध्ये कॉलिटीबाज पान मिळत आहेत.त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी असते.
आपल्या कॉलिटीमुळे प्रसिद्ध असलेले मित्रप्रेम पान शॉप हे लग्नसमारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमाची ऑर्डर देखील घेतात.
येथे करा संपर्क
मंगळवेढा शहरातील रतनचंद शहा बॅंकेसमोर मित्रप्रेम पान शॉप यांना 8208046989 या नंबरवर संपर्क साधू शकता.
पान खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो.
या पानांची मुळ चव ही तिखट स्वरूपात असते, परंतु यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.
हे पान तयार करण्याचीही एक वेगळी पद्धत असते. या पानामध्ये गुलकंद, वेलची, सुपारी, कात, चुना यांसारखे अनेक मसाले टाकले जातात. त्याचप्रमाणे पानामध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्यांनुसार त्यांना वेगवेगळी नावंही देण्यात आली आहेत.
त्यामध्ये गोड पान, साधं पान, बनारसी पान यांसारखे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या या पानांसोबत अनेक नवनवीन प्रयोगदेखील करण्यात येत आहेत.
या पानांमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स अॅड करण्यात येता. त्यात चॉकलेट पान, चंदन पान, स्ट्रॉबेरी पान यांसारखे असंख्य प्रकार पाहायला मिळतील.
शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून खाणं फायदेशीर ठरतं. पान खाल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये लागलेली किड, भूक वाढवणं त्याचप्रमाणे पचन क्रियादेखील सुरळीत होण्यास मदत होते.
जाणून घेऊया पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे…
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी
पान खाल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. हे सलायवरी ग्लॅन्ड्स सक्रिय करून लाळ तयार करण्याचे काम करतात. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. बद्धकोष्ठाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या व्यक्तिंसाठी ह पानं खाणं फायदेशीर ठरतं.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी
पानांमध्ये अनेक गुणकारी तत्व आढळून येतात. ही तत्व शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात. ज्या लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल त्यानी पान खाणं फायदेशीर ठरतं.
त्याचप्रमाणे पान तयार करताना वापरण्यात येणारे मसाले म्हणजेच लवंग, कात आणि वेलची यांचा वापर मुखवास म्हणून केला जातो.
त्याचप्रमाणे पान खाणाऱ्यांच्या लाळेमध्ये एस्कॉर्बिक अॅसिडचा स्तरही सामान्य असतो. त्यामुळे अनेक तोडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
हिरड्यांवरील सूज कमी करण्यासाठी
हिरड्यांवर सूज आली असल्यास किंवा गाठ आली असल्यास पान खाणं फायदेशीर ठरतं. पानांमध्ये असलेली तत्व या समस्या दूर करण्याचे काम करतात.
सामान्य आजारांवरही फायदेशीर
जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर अशातच नागवेलीची ही पानं फायदेशीर ठरतील. एखादे पान मधासोबत खाल्याने फायदा होतो.
त्याचसोबत पानामध्ये असलेले एनालजेसिक गुणधर्म डोकेदुखीवर रामबाण उपाय ठरतात. त्याचप्रमाणे एखादी जखम झाल्यास ही पान खाल्याने जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज