टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे – पाटील यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी मनोज जरांगे- पाटील हे मार्गदर्शन करणार असून सदरची सभा आठवडा बाजार, शिवप्रेमी चौक, मंगळवेढा येथे होणार आहे.
सदर सभेस सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे-पाटील दि.५ आणि ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. समाज बांधवांनी या दौऱ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी केले.
जाधव म्हणाले, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे. मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण केले.
१४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठी जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत आहेत. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता त्यांचे सोलापुरात आगमन होईल. या दौऱ्यात समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत.
.. असा असेल दौरा
दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता सोलापुरात आगमन, साडेचार वाजता मंगळवेढा, सायंकाळी ६:३० वाजता पंढरपूर, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता कुईवाडी, सकाळी १०:३० वाजता बार्शी येथे गाठीभेटी होतील. यानंतर ते धाराशिवकडे रवाना होतील, असे जाधव यांनी सांगितले.
जुने संदर्भ घेऊन या
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणातून मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. समाज बांधवांकडे काही जुन्या नोंदी असतील, जुने दाखले असतील अथवा ही भूमिका बळकट करण्यासाठी काही पुरावे असतील तर त्यांनी घेऊन यावेत. हे पुरावे जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन जाधव यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज