टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील आईसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अर्जुन हरीदास पोळ (वय 15) आणि आर्यन हरीदास पोळ (वय 7, दोघे रा. कर्देहळ्ळी) अशी मरण पावलेल्या मुलांची नाव आहेत. अर्जुन हा इयत्ता 9 वी तर आर्यन हा दुसरीत शाळा शिकत होता.
कुंभारी येथील शेतकरी ढोले यांची कर्देहळ्ळी येथे सोलापूर रोडला शेती आहे. या शेतात हरिदास पोळ हे शेतमजुरीचे काम करतात व तिथे शेतातच कुटुंबासमवेत राहतात.
सोमवारी सकाळी हरी पोळ, त्यांची पत्नी हे दोघेही शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास मोठा मुलगा अर्जुन व दुसरा मुलगा आर्यन हे दोघे शेतातील शेततळ्यांमध्ये पोहण्यासाठी गेले होते.
अर्जुनला पोहायला येत होते तर आर्यनला पोहायला येत नव्हते. शेततळ्यात अर्जुनला पोहताना पाहून आर्यनदेखील पाण्यात पोहण्यासाठी उतरला. त्यावेळी पाण्याची खोली पाहून तो घाबरला व मोठा भाऊ अर्जुन याच्या गळ्यात पडला. त्यामुळे पोहायला येणारा अर्जुन व न पोहता येणारा आर्यन हे दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.
काही वेळातच हे दोघेही पाण्यात बुडाले. ही बाब काही अंतरावर असलेल्या लोकांच्या निदर्शनास पडल्यानंतर त्यांनी शेततळ्यात येऊन दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला.
परंतु, पाण्यात बुडालेल्या दोघांनाही लोकांनी बाहेर काढून बेशुध्दावस्थेत कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
याची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याला मिळताच पोलिस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, अजय हंचाटे, पोलिस शिपाई थोरात, होनमारे यांनी रुग्णालय व घटनास्थळी जाऊन पाहणी करून याबाबत वळसंग पोलिस ठाण्यात नोंद केली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6362 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज