टीम मंगळवेढा तिमेस।
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या कामांसाठी एकूण २२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या आठवड्यात पहिली प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली.
यात अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे संबंधितांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत दुसरे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.
निवडणुकीच्या कामातून सुटका करून घेण्यासाठी अनेक कर्मचारी चुकीचे कारण देत आहेत. कारणाशिवाय तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल करून निवडणुकीच्या कामातून सवलत मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात ४ हजार महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २ हजार कर्मचारी निवडणुकीचे काम पाहणार आहेत
ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्रिय
मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी आकडेवारी येते, ज्या गावात आणि मतदान केंद्रावर जिथे मतदान कमी असेल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी स्वतः ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत मतदान करण्यासाठी फोन कॉल करून मतदानाची आठवण करून देणार आहेत,
तसेच तलाठी, ग्रामसेवक, बीएलओमार्फत प्रत्यक्ष मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक गावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मतदान करण्यासाठी मेसेज करणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज