टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट झालेला आहे. महागाई वाढलेली आहे याबाबत कोणी काहीच बोलत नाहीत परंतु भाजपाचे लोक मोदी आणि त्यांची गॅरंटी, कसली गॅरंटी माहीत नाही,
आम्ही पन्नास साठ वर्षे राजकारणात आहोत गॅरंटी कोणालाच दिली नाही, जनताच तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही कुठली गॅरंटी देता?, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
मंगळवेढा येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या संकल्प सभेच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर निरंजन टकले, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा जयमाला गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शरद पवार गटाचे चंद्रशेखर कोंडूभैरी, काँग्रेस नेते अर्जुन पाटील, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील, प्रा.शिवाजी काळुंगे, शोभा काळुंगे, मारूती वाकडे, शिवशंकर कवचाळे, पांडुरंग जावळे, मनोज यलगुलवार ,फिरोज मुलानी, ॲड.रवीकिरण कोळेकर, राजाभाऊ चेलेकर, विजय खवतोडे, सुशील बंदपट्टे, गणेश डोंगरे, मुझमिल काझी, चंद्रशेखर कोंडुभैरी, दिलीप जाधव, आदीजन उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील जनता सुज्ञ असून येथील नागरिकांनी काँग्रेस पक्षाला वेळोवेळी मोठी मदत केलेली आहे.
येणारी निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही ची आहे, मंगळवेढावासीयांनी लोकसभा निवडणुकीत लोकशाही टिकविण्यासाठी काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
साखर निर्यात बंद केल्याने जिल्ह्यातील कारखानदारी संकटात; अभिजित पाटील
केंद्र सरकारने साखर निर्यात बंद केली आहे. इथेनॉल निर्मिती बंद करत साखर कारखानदारी संकटात आणली जात आहे. खोट्या कारवाया केल्या जात आहेत.
दुष्काळी यादीतून पंढरपूर तालुका वगळला आहे. उन्हाळ्यात पाणी येणे गरजेचे आहे, अशी टीका ‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांनी महाविकास आघाडीच्या संकल्प मेळाव्यात केली.
याप्रसंगी रविराज मोहिते, मनोज माळी, सैफण शेख, संतोष रंधवे, सुनीता अवघडे, अमोल म्हमाणे, संगीता कट्टे-पाटील, पांडुरंग माळी, शहाजान पटेल, सागर गुरव, जयश्री कवचाळे, आयेशा शेख,
बाबुराव पाटील, अजय यादव, नाथा आयवळे, म्हांतेश पाटील, पांडुरंग चौगुले, सत्तार इनामदार, तसलीम आकुंजी, मनीष गडदे, संदीप पवार, शहाजी कांबळे, तिरुपती परकीपंडला, बजरंग चौगुले, दिनकर खांडेकर, जमीर इनामदार, राहुल हेंबाडे, अशोक चेलेकर, बाळू वाघमोडे, फारुख मुजावर, रोहित उगाडे आदीजन उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज