टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पुन्हा एकदा मोठा झटका दिलाय.
नवाब मलिक यांची राज्यभरातील एकूण 9 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबईसह उस्मानाबादेतील 148 एकर शेतजमिनीचाही समावेश आहे.
ईडीकडून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आलीय. मलिकांचे मुंबईतील एकूण 5 फ्लॅट जप्त करण्यात आलेत. त्यात कुर्ल्यातील 3 तर वांद्रे परिसरातील 2 फ्लॅटचा समावेश आहे.
नवाब मलिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयंशी संबंधित असलेल्या मेसर्स सोडियम इनवेस्टमेन्ट प्रायवेट लिमिटेड आणि मेसर्स मलिक इन्फ्रान्स्ट्रकचर या कंपनीच्याही मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
कोणत्या कायद्याखाली कारवाई?
2002 सालच्या मनी लॉन्ड्रिग कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे.
कधीचं प्रकरण?
3 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर ईडीनं चौकशी सुरु केली होती. दाऊद इब्राहिम आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींकडून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
त्यानुसार यूएपीएच्या कलम 120 बी, कलम 17,18, 20, 21, 38 आणि 40 नुसार तक्रार नोंदवून घेण्यात आलेली होती. या तक्रारीच्या आधारावर ईडीकडून तपास करण्यात सुरु करण्यात आला होता.
तक्रारीत कुणाकुणाची नावं?
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये दाऊद इब्राहिम, हाजी अनीस, शकील शेख (छोटा शकील) , जावेद पटेल, टायगर मेमन, जावेद चिकणा यांना संशयित आरोपी ठरवण्यात आलं होतं. भारत सोडल्यानंतर दाऊदनं आपली गुन्हेगारी कृत्य याच निकटवर्तीयांच्या मदतीनं सुरुच ठेवल्याचाही ठपका ठेवण्यात आला होता.
ईडीनं तपासात महत्त्वपूर्ण बाबी समोर आणल्या आहेत. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, मुनिरा प्लंबर यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्र दाखवण्यात आली.
नवाब मलिकांच्या सोडियम इनवेस्टमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड ही नवाब मलिकांच्या कुटुंबीयांपैकी एकाच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीसोबत हसीना पारकर आणि दाऊदशी संबंधित व्यक्तींनी जमीन हडप केली.
हसीना पारकर आणि नवाब मलिक यांनी एकत्र येऊन हे गुन्हगारी कृत्य केल्याचंही ईडीनं म्हटलंय. मुनिरा प्लंबर यांची मालमत्ता बेकायदेशीरपणे हटपण्यात आली.
सोडियम इनव्हेस्टमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ही जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला. ही कंपनी नवाब बलिक यांच्याकडून कंट्रोल केली जाते, असं इडीनं म्हटलंय.
तसंच हसीना पारकर, सरदार शाहवाली खान, सलीम पटेल आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंड येथील कुर्ल्यातील तीन एकर जमीन हडप केल्याचंही ईडीनं नमूद केलंय.
बेकायदेशीरपणे या जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. याच मालमत्तेतून 11.70 कोटी रुपयांचं भाडंही नवाब मलिकांच्या मालकीच्या असलेल्या कंपन्यांना देण्यात आल्याचंही चौकशीतून समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणी मलिकांच्या एकूण पाच मालमत्तांवर ईडीनं टाच आणली आहे.(स्त्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज