टीम मंगळवेढा टाईम्स ।
ट्रॅक्टर टोळी मालकाकडून ऊसतोडणी मुकादम याने लेखी करारनामा करून १२ महिला व १२ पुरुष असे एकूण २४ ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या मोबदल्यात ९ लाख रुपये घेतले.
मात्र, गळीत हंगाम संपला तरी मुकादम यांनी ऊस तोडणी मजूर पुरवठा न करता ट्रॅक्टर टोळी मालकाची सुमारे ९ लाख रुपयांची फसवणूक केली.
याबाबत नितीन शिवाजी बेदूंगडे (रा. महिम ता सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी अशोक पोहल्या वळवी (रा. खर्डा ता.धडगाव जि. नंदूरबार) याचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी नितीन बेंदुगडे हे ऊस तोडणी टोळीमार्फत स्वतःच्या ट्रॅक्टर मधून साखर कारखान्यास ऊस पुरवठा करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या गावातील यशवंत कारंडे यांचा देखील ट्रॅक्टर असून तेही ऊस तोडणीचा व्यवसाय त्यांच्या ओळखीने फिर्यादी कारंडे यांनी ऊसतोड करतात.
मुकादम अशोक पोहल्या वळवी (रा. खर्डा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याच्यासोबत सन-२०२३-०२४ मध्ये कारखाना गळीत हंगामासाठी ऊसतोडणी मजूर पुरवण्याकामी दि.२४ मे ०२३ रोजी लेखी करार केला होता.
सदर करारानुसार त्यांनी १२ पुरुष व १२ महिला असे एकूण २४ ऊस तोडणी मजूर पुरवण्यासाठी फिर्यादीकडून ९ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
त्यापैकी ३ लाख २० हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात दिले तर त्यांनी स्वतः च्या बँक ऑफ इंडिया महूद शाखेतून ५ लाख ८० हजार रुपये टप्प्या-टप्प्यांने वळवी यांच्या खात्यावर पाठविले होते
दरम्यान करार करतेवेळी अशोक वळवी यांनी सदर रकमेस तारण म्हणून त्यांचा भारतीय स्टेट बँकेचा सही करून चेक (धनादेश) दिला होता.
सन २०२३-०२४ ऊस गळीत हंगाम सुरू झाला तरी त्याने फिर्यादी नितीन बेढुंगुडे यांना ऊस तोडणी मजूर न पुरविता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज