टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय नवविवाहितेने अज्ञात कारणावरून राहते घरात धोतराच्या सहाय्याने लाकडी खांडाला गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची घटना घडली असून याची मंगळवेढा पोलिसांत नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील खबर देणारे महेश आप्पासो माळी हे पिंपरी चिंचवड येथे मिलटरीमध्ये सिग्नल ऑपरेटर या पदावर कार्यरत असून
त्यांनी ३ ते २७ नोव्हेंबर अखेर रजा काढून पत्नी ज्योती महेश माळी (वय ३१ वर्षे ) हे दोघे त्यांच्या माळेवाडी ता.मंगळवेढा येथील मूळ गावी आले होते.
त्यांचा विवाह मागील दीड वर्षापुर्वी झाला होता. खबर देणारे हे कर्नाटकातील हुन्नूर ता. इंडी येथे त्यांच्या भावाच्या मेव्हण्याचा ओटी भरण्याचा कार्यक्रमास गेले होते.
त्यांना सायंकाळी ७.०० वा. त्यांचा भाऊ नागेश माळी यांचे मोबाईलवर निखील माळी यांनी फोन करून सांगितले की ज्योती मामी घराचे दार उघडत नाही,
तुम्ही लवकर या असे सांगितल्याने रात्री ८.३० पर्यंत माळेवाडी येथे आले. तत्पुर्वी खबर देणाऱ्याची मावशी महादेवी माळी व निखील माळी यांनी घराचे दार तोडून
खबर देणाऱ्याची पत्नी ज्योती हिने गळफास घेतल्याचे दिसल्याने तीला सोडवून जमिनीवर खाली झोपवलेल्या अवस्थेत त्यांना दिसले.
त्यावर पतीने जवळ जावून पाहिले असता तीच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसून आली नसल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज