मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी कोरोनाला हरवू शकलो. त्यामुळे या पुढील काळात मतदार संघातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी लवकरच मतदार संघात येणार असल्याची माहिती मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या काळामध्ये आमदार भारत भालके यांनी मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी नियमित भेटी देऊन समस्या जाणून घेण्याचा नित्यक्रम ठेवला होता.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामात संचालक , अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आमदार भारत नाना भालके यांनी देखिल कोरोना टेस्ट करुन घेतली होती.यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले.
दक्षता म्हणून पुढील उपचारासाठी ते पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अवघ्या सहाच दिवसांमध्ये आमदार भारत नाना भालके यांनी कोरोना मात केली आहे.
आज बुधवारी सकाळीच्या कोरोना सोडून सर्व चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. त्यामुळे आमदार भारत भालके पुन्हा एकदा जॉईट किलर ठरले आहेत.
आपल्या राजकीय जीवनात त्यांनी जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर अनेक प्रतिस्पर्थ्यांना हाबडा दिला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर मतदारसंघासह राज्यातील सर्वधर्मीय भालके प्रेमींनी त्यांच्या कोरोनामुक्तीसाठी देवाला साकडे घातले.
अखेर जनतेच्या कृपाशीर्वादाने आमदार भारत भालके कोरोनामुक्त झाले आहेत. लवकरच नव्या जोमाने ते जनसेवेसाठी मैदानात येतील.
एकंदरीत आमदार भारत भालके यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज