मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
शेत जमिनीची खरेदी परवानगीचा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदाराने 15000 रुपये लाचेची मागणी केली तिलाच एका खाजगी इसमास देण्यास सांगितले.
ती पंधरा हजाराची लाच घेणाऱ्या दोन खाजगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्या नायब तहसीलदार विरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आप्पासाहेब शिवाजी तोंडसे, (वय ५६, पद- नायब तहसिलदार (वर्ग-२) नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर) आरोपी खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम (वय ५९ व्यवसाय किराणा दुकान, रा.गौतम विद्यालय समोर पंढरपूर) व खाजगी इसम सचिन विठ्ठल बुरांडे (वय ४६ रा.विट्ठलनगर, गौतम विद्यालय शेजारी पंढरपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या शेजारील १० गुंठे शेतजमीन खरेदी केली असून, सदर शेत जमीन ही १० गुंठे असल्याने सदरच्या खरेदी करीता उपविभागीय अधिकारी, उपविभाग पंढरपूर यांची परवानगी आवश्यक असते.
सदर परवानगी मिळणेकरीता यातील तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभाग पंढरपूर येथे प्रस्ताव सादर केला. सदरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेकडून मंजुर करुन घेवून शेतजमीन खरेदीची परवानगी देण्याकरीता
यातील लोकसेवक आप्पासाहेब शिवाजी तोंडसे, पद- नायब तहसिलदार नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर यांनी तक्रारदार यांच्याकडे २०,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंति १५,००० रुपये लाच रक्कम खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम यांचेकडे देण्यास सांगीतली.
त्यावेळी सदरची लाच रक्कम तुकाराम बाळकृष्ण कदम यांनी स्वीकारून ती सचिन विट्ठल बुरांडे, यांचेकडे दिली असता
सचिन बुरांडे यांनी सदरची लाच रक्कम स्विकारली असून वर नमुद आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर.
पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना अतुल घाडगे, पोकों सलिम मुल्ला, चापोह राहुल गायकवाड, सर्व नेम एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज