टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र बँकेच्या पेनूर शाखेकडून २० लाख ३५ हजार रुपये कर्ज घेऊन स्वतःची जमीन त्या बँकेकडे तारण म्हणून ठेवली होती.

मात्र, कर्जदार व जामीनदाराने संगनमत करून ती जमीन विक्री केल्याप्रकरणी पेनूर येथील दोघांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०२२ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेनूरला गाव तलाठी यांनी नोटीस पाठवून सुनीता बाळासाहेब भांगे (रा. पेनूर) यांनी त्यांची

शेतजमीन ही परमेश्वर दगडू राऊत (रा. पेनूर) यांना विकली असून, बँकेची काही हरकत असेल तर हरकत घ्यावी म्हणून नोटीस दिली.

बँकेचे मॅनेजर कोठेश्वराव रामराव मंधिनी (रा. लक्ष्मी टाकळी रोड, पंढरपूर) यांनी दोन्ही नावांच्या बाबत माहिती घेतल्यानंतर सुनीता भांगे यांच्याकडे दोन कर्ज खात्यामध्ये २० लाख ३५ हजार रुपये कर्ज असल्याचे निदर्शनास आले.

कर्ज घेताना भांगे यांनी कर्ज फरतफेडीच्या सर्व अटी व शर्ती तसेच त्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोजा असताना कर्जाचेच जामीनदार परमेश्वर राऊत यांना ती जमीन खरेदीखत करून दिली.


त्यानुसार बँकेला तारण असलेली जमीन बँकेच्या परस्पर विकून २० लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार सुनीता भांगे व जामीनदार परमेश्वर राऊत अशा दोघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















