टीम मंगळवेढा टाईम्स।
जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याची आगळी-वेगळी घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली होती.सोशल मीडियावर याबाबतची जोरदार चर्चा देखील सुरु झाली होती.
राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील संसदेत याबाबत भाष्य केलं आहे.
सोलापुरात घडलेला प्रकार हा हिंदू संस्कृतीवर डाग लावण्यासारखा आहे. तरुणाने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न केले आहे.
कलम 494, 495 त्यांच्यावर लावलेले असले तरी एकाच व्यक्तीने दोन महिलांसोबत लग्न करण्याबाबत असा एखादा कायदा किंवा नियम बनवायला हवा असं खासदार राणा संसदेत म्हणाल्या.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) December 14, 2022
तसेच असे प्रकार करणाऱ्यांना शासन केले पाहिजे कारण अशा प्रकारांमुळे आपल्या संस्कृतीला धक्का पोहचत आहे.
कारण हे सर्व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि अशा प्रकारे आपल्या संस्कृतीला धक्का लागता काम नये असं स्पष्ट मत नवनीत राणा यांनी संसदेत मांडल.
रिंकी आणि पिंकी असे जुळ्या बहिणींची नावे असून अतुल असे नवरदेवाचे नाव आहे. शुक्रवारी (२ डिसेंबर) अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हाॅटेल येथे हा विवाह सोहळा पार पडला होता.
अतुल माळशिरस तालुक्यातील आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी कांदिवली मधील आहेत.
सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या होत्या. त्यानंतर अतुलने त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांची काळजी घेतली. यातूनच त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने हा विवाह पार पडला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज