टीम मंगळवेढा टाईम्स।
नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा होत असून, तहसीलदार यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिले तरीही त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही म्हणून प्रहारचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांचे सीना नदीपात्रात बेमुदत उपोषण सुरू केले.
मोहोळ तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिज आणि वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्याला तहसीलदार यांचे अभय आहे का? त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असल्याने उपोषण सुरू केल्याचे पाटील यांनी सांगितले.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल यामुळे बुडत आहे. तरी अशा अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर आणि आर्थिक हितसंबंध जपणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी.
आंदोलन लक्षवेधी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे मोहोळ तालुका कार्याध्यक्ष अनिल पाटील यांनी सीना नदीपात्रात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.(स्रोत:दिव्य मराठी)
तलाठ्यांना सांगितले आहे, ते उत्तर देतील
पाटील यांच्या निवेदनाची उत्तर कालच दिले आहेत. त्यांनी कालच निवेदन दिले आणि आज आंदोलन सुरू केले. संबंधित तलाठ्यांना सांगितले असून, तलाठी त्यांना उत्तर देतील, असे म्हणत मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी फोन बंद केला.
तीन गावच्या तलाठ्यांची हद्दीवरून टोलवाटोलवी
या संदर्भात मोहोळ तालुक्यातील शिरापूर, आष्टे व कोळेगावच्या गाव कामगार तलाठ्यांना फोन केले असता आंदोलनकर्ता आमच्या गावच्या हद्दीत नसल्याने आम्ही आंदोलनस्थळी जाऊ शकलो नसल्याचे सांगत टोलवाटोलवीची उत्तरे दिली.
वाळू वाहतूकदार व पाठीशी घालंणारांवर कारवाई व्हावी
अवैध वाळू उपसा वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी निवेदन मोहोळ तहसील विभागाला दिले असता नदीतला पंचनामा कसा करायचा आणि गुन्हा कोणावर दाखल करायचा? असे फोनवर म्हणत तुमच्या आंदोलनाने शांतता भंग होईल आणि होणाऱ्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल म्हणत आंदोलनापासून परावृत्त करण्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. या वाळूवाहतूकदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.- अनिल पाटील, आंदोलनकर्ता
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज