टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील अकोले येथून १८ हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल हँडल लॉक तोडून चोरटयांनी पळवून नेली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मंगळवेढयात मोटर सायकल चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मोटर सायकलस्वार धास्तावले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी सुरेश साळसकर हे दि. ६ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरेश शिवाप्पा कनुरे यांच्या शेतातील पत्रा शेडमध्ये
हँडल लॉक करून शेतामध्यें काम करण्यास फिर्यादी गेले असता १८ हजार रुपये किमतीची हिरो होंडा मोटर सायकल ( एम एच १३ , बी . डब्ल्यू २० ९ ४ ) चोरटयांनी हँडल लॉक तोडून नेली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोटर सायकल चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे मोटर सायकलस्वार धास्तावले आहेत.
सर्वसामान्य व्यक्तीकडे मोटर सायकलीचा वापर होत असल्याने बाजारातून खरेदी करून येईपर्यंत मोटर सायकल जागेवर राहते की नाही याची शाश्वती सध्या नसल्यामुळे मोटर सायकलस्वार भयभीत झाले आहेत.
पोलिसांना आत्तापर्यंत एकही मोटर सायकलस्वार सापडला नसल्यामुळे चोरट्यांचे बळ वाढत चालले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज