मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका उच्चशिक्षित महिलेने पोटच्या दोन मुलांची निघृण हत्या केली. आरोपी महिलेने दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर धारदार कोयत्याने आपल्या पतीवरदेखील हल्ला केला.
या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे.
कोमल मिंढे असे आरोपी महिलेचे नाव असून, एक वर्षाचा मुलगा शंभू मिंढे आणि तीन वर्षांची मुलगी पियू मिंढे अशी हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. आरोपी महिलेने पती दुर्योधन मिढे यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला आहे.
दुर्योधन यांच्या मानेला आणि हाताला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दुर्योधन मिंढे हे आयटी इंजिनीयर असून ते स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावातील रहिवासी आहेत. ते पुण्यातील खराडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतले असून, ते घरूनच काम करतात.
स्वामी चिचोली येथे त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात ते पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते. शनिवारी पहाटे पत्नीने आपल्या दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने धारदार हत्याराने झोपलेल्या पतीवर हल्ला केला.
या हल्ल्यात पती दुर्योधन गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेला आणि हाताला दुखापत झाली. पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर तातडीने दुर्योधन यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दोन्ही पती-पत्नी उच्चशिक्षित असतानाही वरील दुर्दैवी प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी आरोपी कोमलला ताब्यात घेतले असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत. दरम्यान, ही घटना दररोजचे घरगुती भांडण किंवा भांडणतंटा होतात यातून घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
पुरावे असतील किंवा जी काही वस्तुस्थिती असेल त्या पद्धतीने तपास करत आहोत, अशी माहिती दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज