पंढरपूर : राजेंद्र फुगारे
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या वतीने प्रतेक वर्षी प्रमाणे ‘बजेट पे चर्चा’ अर्थात महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण डीव्हीपी स्क्वेअर, पंढरपूर येथे पंढरपूर मंगळवेढा येथील मान्यवरांसोबत पार पडले
पुढे निवडणुकां आसून देखील सामन्या नागरिकांची काही देऊ शकले नाहीत केवळ गाजर दाखविणारा हा अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी त्यांच्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाही.
अर्थसंकल्पाच्या नावाखाली सरकारने ९९ हजार कोटी महसुली तुटीचे बजेट मांडले आहे.. यापूर्वी देखील अशाच प्रकारे १७ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेला.. आधीच्या कामांचे आणि घोषणांचे काय झाले? किती कामे पूर्णत्वास गेली? याचा आधी शासनाने खुलासा केला पाहिजे.
कुठलेही आर्थिक नियोजन नसताना केवळ पुढील काळात येणाऱ्या निवडणुका बघून लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, असाच एकूण निष्कर्ष या अर्थसंकल्पाकडे बघून काढावा लागतो असे मत अभिजीत पाटील यांनी मांडले.
यावेळी पंढरपूर माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे नेते, देवानंद गुंड पाटील, विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील, राजेंद्र मोरे महाराज मा.नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, पंकज देवकते, शिवसेना (उबाठा) रणजीत बागल, कर सल्लागार विश्वंभर पाटील, केदार कटेकर, उद्योजक यश उत्पाद,
तुकाराम मस्के, राधेश बादले पाटील, सप्तसुंगी बँकेचे अमोल चव्हाण, गणेश बागल, प्रविण पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, कार्याध्यक्ष मुझमिल काझी, पत्रकार प्रशांत मोरे, समाधान गाजरे, ॲड. संजय रोंगे, किरण घोडके, संदेश दोशी, ॲक्सिस बँकेचे विशाल साळुंखे, विद्यार्थिनी कोमल कौंडूभैरी, ऋतुजा फाळके,
मृण्मयी कोळसे, अहरम वाघमारे, नितीन पारसे, जमीर शेख यासह विविध क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, लघुउद्योजक, डॉक्टर, सी.ए., सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील तज्ञ व नागरिक उपस्थित होते.
पंढरपूर मंगळवेढा व सोलापूर जिल्हास भोपळा मिळाला
ह्या अर्थसंकल्पात पंढरपूर मंगळवेढा व सोलापूर जिल्हास भोपळा मिळाला आहे, विमानतळासाठी सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडली परंतू बजेट मध्ये निधी दिला नाही हि खेदाची बाब आहे. तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेढ्यातल्या उपसा सिंचन योजनेसाठी ह्या बजेट मध्ये निधी नाही दिल्यास २४ गावतली लोक कर्नाटक राज्यात जाण्याचा व लोकसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचे गाव गावी ठराव झाले
सत्ताधारी पक्षाचे आमदार आसून देखील उपसासिचंन योजनेस निधी मिळवण्यात अपयशी ठरले तसेच महात्मा संत बसवेश्वरांचे स्मारक व संत चोखामेळा यांच्या स्मारकास पंढरपूर विकासला एक ही रुपाय निधी तरतूद केली नाही, आमदार हे भाजपचे सत्ताधारी असून आमदारांना निधी दिला जात नाही त्यामुळे आमदाराना किती किमंत आहे हे ह्यावरुन स्पष्ट होते. आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही असा आरोप अभिजीत पाटील यांनी केला आहे.-अभिजीत पाटील. चेअरमन श्री विठ्ठल सह.साखर
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज