टीम मंगळवेढा टाईम्स ।
राजकारण हा विषय माझ्या आवडीचा नव्हता. मात्र, मागील संचालक मंडळामध्ये मी संचालक पदावर असताना झालेले कामकाज माझ्या बुध्दीला पटत नव्हते. शिवाय बहुमतापूढे माझे कांही चालत नव्हते.
मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठीच राजकारणात आलो. माझ्या राजकारणाची सुरुवातच दामाजी कारखान्यापासून झाल्याचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
कामगार संघटनेच्या वतीने सहा वर्षात एकही हंगाम बंद न ठेवता गाळप व कामगारांना वेतनवाढ दिल्याबद्दल स्नेहभोजन व संचालक मंडळाचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना आवताडे म्हणाले ”की या कारखान्याची टेक्नाॅलाॅजी 32 वर्षापूर्वीची असून त्यामध्ये माॅडीफिकेशन करणे गरजेचे असल्याने संचालक मंडळाने सायलो सिस्टीम किंवा इतर कांही माॅडीफिकेशन केल्याचा फायदा कारखान्याला झाला आहे.
प्रत्येक हंगामात मजुरीसाठी खर्च होणारी कोटयावधी रुपयाची बचत झाली. डिस्टीलरीचे भूमीपुजन होवून अनेक दिवस झाले. मात्र, 45 केएलपीडी ची परवानगी असल्याने सदर प्रकल्प सुरु करण्यात आला नाही.
1 लाख केएलपीडीची परवानगी घेवून प्रकल्प सुरु केल्यास याचा फायदा कारखान्यास होईल. शेतक-यांची बिले, कामगारांचा पगार देण्यामध्ये मागे पुढे झाले.
मात्र, ती वेळेवर देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. वेळ पडल्यावर संचालक मंडळाने आपल्या खिशातील पैसे देवून प्रसंगी स्वतःच्या जमीनी गहाण ठेवून कारखान्यास रक्कम उपलब्ध करुन दिली आहे.
प्रत्येक निवडणुकीत सर्व कामगारांनी माझ्या खांद्याला खांदा लावून साथ दिल्यामुळे या संस्थेचा चेअरमन आणि आमदार म्हणून माझे काम चालू आहे. मी पैशासाठी राजकारणात आलो नाही. आजपर्यंत राजकीय ताकद कमी पडत होती, असेही आवताडे यांनी सांगितले.
मात्र, तुम्ही मला संधी दिली. यापुढे भविष्यामध्ये निश्चीतच ही कसर भरुन काढणार आहे. यापुढेही सभासद शेतकरी, कामगार यांना न्याय देण्याचे काम मी करणार आहे.
खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी म्हणाले, समाधान आवताडे हे राजकारणी वाटत नाहीत. राजकारण्यांची भाषा वेगळी असते. आवताडे यांचा दृष्टीकोण सकारात्मक आहे.
यावेळी संचालक लक्ष्मण जगताप, राजेंद्र सुरवसे, राजीव बाबर, राजेंद्र पाटील, शिवयोग्याप्पा पुजारी, बापू काकेकर, बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण, लक्ष्मण नरुटे, भुजंगराव आसबे, सुरेश भाकरे, अशोक केदार, विजय माने,
संचालिका सौ.स्मिता म्हणाले, कविता निकम, तसेच प्रायेताळा भगत, प्रदिप खांडेकर, शशिकांत चव्हाण, अशोक माळी, भारत निकम, संचालक रमेश गणेशकर,
सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विठठल गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी तर आभार अशोक केदार यांनी मानले.(स्त्रोत;सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज