टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर मंगळवेढा विजयपूर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी आ. समाधान आवताडे यांचा पाठपुरावा सुरूच असून त्यासाठी आठ महिन्यात आज दुसऱ्यांदा रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली परंतु यासाठीचा ग्रीन सिग्नल मात्र अजूनही मिळेना.
त्यामुळे प्रलंबित रेल्वे मार्गाचा प्रश्न कधी मार्गी लागणार याची उत्सुकता लागली आहे.
कानडा राजा पंढरीचा म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या भेटीसाठी कर्नाटकातून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून विजयपूर ते पंढरपूर हे रेल्वे मार्गाने जोडल्यास या भागातील भाविकांची संख्या आणखीन वाढणे व त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे फायदेशीर ठरणार आहे.
शिवाय हीच रेल्वे पंढरपुरातून पुढे लोणंदला जोडल्यास सोलापूर मार्गावरून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेचे जवळपास एकसष्ट किलोमीटरचे अंतराची व त्यावरील खर्चाची बचत होणार आहे.
स्व.आ.भारत भालके यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना देखील निवेदन दिले होते. परंतु राजकीय अनास्थेमुळे या रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षात रखडला.
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नंतर ही जागा भाजपकडे आल्यानंतरच स्थानिक आमदार, खासदार व केंद्रातील सरकार हे भाजपाचे झाल्यामुळे या मुळे रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा होती.
लवकरच बैठक घेऊ : रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे
यासाठी आ.समाधान आवताडे यांनी 27 जुलै 2021 रोजी दिल्लीत भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती परंतु यावर आठ महिन्यात कोणतीही हालचाल झाली नसल्यामुळे काल आ.समाधान आवताडे यांनी पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.
राज्यात अनपेक्षितरित्या तयार झालेल्या महा विकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत भाजप नेत्यांनी पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात घेऊन हिसकावून भाजपाने महा विकास आघाडी सरकार हे जनमताच्या विरोधातील आहे हे दाखवण्यात भाजपाचे नेते यशस्वी ठरले
व राज्यात आ.समाधान आवताडे हे राज्यात देखील चर्चेत आले होते मात्र नवख्या अवताडेना त्यांची राजकीय कारकीर्द बहरण्यासाठी केंद्रातील भाजप नेत्यांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्यामध्ये बहुचर्चित 35 गावाच्या प्रश्नासाठी केंद्रातून निधी आणण्याचा शब्द विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
तसेच या मतदारसंघातील रेल्वे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे जास्तीचे उदिष्ट व प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील पिक विमाधारक शेतकऱ्यावरील झालेला अन्याय, पंढरपूर सांगोला बायपास हे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने तातडीने आ.समाधान आवताडेच्या मागण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
पंढरपूर विजयपूर रेल्वेमार्गासाठी आ.समाधान अवताडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज