मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी महमदाबाद(शे),गुंजेगाव सह अनेक परिसरात व पंढरपूर तालुक्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे या भागातील घरांचे लहान मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. एकाच वेळी सर्वत्र अवकाळी पाऊस न पडता विविध ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसत आहे.
तरी या सर्व भागात प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावेत असे आदेश आ. समाधान आवताडे यांनी मंगळवेढाचे तहसीलदार जाधव व पंढरपूर तहसीलदार बेलेकर यांना दिले आहेत.
शनिवारच्या वादळात महमदाबाद(शे) दहिवडी परिसरात अनेक घरांना याचा फटका बसला. महमदाबाद (शे) वाऱ्याने वीज कनेक्शनची वायर तुटून रामचंद्र म्हमाणे यांच्या दोन जर्शी कालवडी दगावल्या आहेत दहिवडी येथेही पत्रे लागून जर्शी गाय जखमी झाल्या आहेत.
अनेकांच्या घराचे पत्रे उडून संसार उघड्यावर आले आहेत. लवंगी परिसरात झाडे उन्मळून पडली आहेत तसेच उचेठाण परिसरात हि विज पडून, जनावरांच्या अंगावर झाडे पडून जनावरेही जखमी झाली आहेत.
द्राक्ष डाळिंब पपई यासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विजेचे पोल पडून वीजपुरवठा खंडित झाला असून लक्ष्मी दहिवडी परिसरात २५ हुन अधिक विजेचे पोल पडले आहेत.
तरी मतदारसंघातील सर्व गावात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जाऊन नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तात्काळ करावेत असे आदेश आ.समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज