टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला व तुझ्या वडिलांना मारून टाकीन अशी धमकी एका १८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने दिल्याने
तिने विषारी औषध प्राशन करून जीवनाचा शेवट केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संतोष आप्पासो पारे (रा. येळगी, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी हा फिर्यादीच्या किराणा दुकानात कामाला होता. त्याने कुटुंबीयांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दि.२५ एप्रिलला फूस लावून पळवून नेले होते.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी आरोपीस व अल्पवयीन मुलीस दि. २६ एप्रिलला शोधून आणून हा प्रकार आपसांत मिटवून घेऊन त्याला कामावरून काढून टाकले होते.
दि.६ जूनला त्या अल्पवयीन मुलीने दुपारी १२ ते १ च्या दरम्यान विषारी औषध प्राशन केले होते. दि.१० जूनला उपचारादरम्यान ती मृत झाली, असे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज