टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा,पंढरपूर, मोहोळ तालुक्याबरोबर इतर प्रत्येक तालुक्यात ज्या ज्या गावातून उजनी धरणाचा उजवा डावा कालवा गेला आहे त्या काळामध्ये चाळीस वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला काही शेतकऱ्यांनी घेतला नाही.
मिळाला तो तोकडा मोबदला मिळाला आहे त्यांना सुधारित पद्धतीने पाचपट नुकसान भरपाई मिळावी समृद्धी महा मार्गामध्ये रस्त्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला एका गुंठ्याला चार ते पाच लाख रुपये शासनाने दिला.
मग उजव्या – डाव्या कालव्यामध्ये मध्ये गेलेला जमिनीच्या संपादित जमिनीचा मोबदला या शेतकऱ्यांना तोकडा अल्प रकमेचा कशासाठी यांनाही सुधारित वाढीव मोबदला द्यावा अशीही मागणी शेतकरी संघटनेने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात लावून धरली होती.
पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन झाले होते माननिय प्रांत अधिकारी व जलसंपदा अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावल्याचे पत्रकारांशी बोलताना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावरील गेलेल्या शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला शासनाने गुंठ्यावर चार ते पाच लाख रुपये दिले परंतु चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी उजनी धरणाच्या कॅनॉल मध्ये गेलेल्या संपादित जमिनीचा मोबदला त्या काळात एकरी चार ते पाच हजार रुपये देण्यात आला होता.
आणि त्या काळात काही शेतकऱ्यांनी योग्य मोबदला दिला नसल्यामुळे पैसे उचलले नव्हते त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सुधारित वाढीव मोबदला द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या उजव्या – डाव्या कालव्यावर च्या शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही देशमुख यांनी बोलताना केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज