टीम मंगळवेढा टाईम्स ।
आसबेवाडी (ता.मंगळवेढा) येथील माया शिवाजी मासाळ(काळे ) यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नुकतीच महसूल सहायक पदी निवड झाली असून जिद्द व चिकाटीच्या जोरावर
मायाने मिळविलेल्या या यशाचे आसबेवाडीसह तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन करून कौतुक होत आहे.
स्पर्धा परीक्षा तयारी ही सामान्यतः कठीण आणि आव्हानात्मक असते. मात्र, अनेक अडचणींवर मात करून माया मासाळने यश संपादन करून गावची शान वाढवली आहे.
जिद्द, संघर्षाची तयारी आणि त्याला अभ्यासाची जोड असेल, तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते हे माया हिने सिद्ध करून दाखवले आहे.
इथपर्यंत येण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला
हे यश सहज मिळालेले नाही. अनेकदा अडचणी आल्या, माझ्या आयुष्यात इथपर्यंत येण्यासाठी खूप अडचणींचा मला सामना करावा लागला. पण आई-वडिल , मामा मामी, पती महेश काळे यांच्यासह माझे भाऊ आदींनी कायम माझा आत्मविश्वास वाढवला. – माया मासाळ..
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज