टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील एका २७ वर्षीय विवाहितेचे तोंड दाबून तू मला खूप आवडतेस असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी
नासीर उर्फ बाळू हसूलाल दरवाजकर व अन्य एका अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील २७ वर्षीय पीडित महिला बुधवारी पहाटे पाच वाजता घराबाहेर नमाज पढण्यासाठी अंगणात हात पाय धूत असताना
वरील संशयित आरोपीने येऊन पीडित महिलेचा डावा हात पकडून तोंड दाबून तू मला फार आवडते, असे म्हणून वाईट भावनेने व उद्देशाने ओढू लागल्याने पीडितेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली.
या वेळी आरोपीने कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या पतीला खल्लास करेन, अशी धमकी दिली. पीडित महिलेचा विनयभंग करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.
आरोपीच्या मेव्हण्याने फोनवरून धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल नासीर पठाण हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज