मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
माहेरहून कर्ज फेडण्यासाठी पैसे घेऊन ये तसेच तुझ्या घरच्याने लग्नात आमचा व्यवस्थित मानपान केला नाही, असे म्हणून एका २३ वर्षीय विवाहितेस शारीरिक, मानसिक त्रास देवून शिवीगाळी केल्याप्रकरणी

पती – अविनाश बाबासाहेब कोरडे, सासू सुवर्णा बाबासाहेब कोरडे, सासरे बाबासाहेब बब्रुवाहन कोरडे, दीर सुहास बाबासाहेब कोरडे,

जाऊ भावना सुहास कोरडे, नणंद रुपाली सचिन सुळे – (सर्व रा. सापटणे, ता. माढा) या सहा – जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील फिर्यादी पायल अविनाश कोरडे (वय २३, सध्या रा. आंधळगाव) हिचा विवाह २३ फेब्रुवारी २०२५ रोजी – मध्ये फिर्यादीच्या वडिलाने स्वखर्चाने स्नेहल लॉन्स पिंपळनेर (ता. माढा) येथे स्वमर्जीने ७ तोळे सोने तसेच महागडे व चांगल्या प्रतीचे कपडे रूकवताचे साहित्य,
सर्व संसार उपयोगी भांडीकुंडी देऊन योग्य तो मानपान करुन मोठ्या थाटात अविनाश बाबासाहेब कोरडे यांच्याशी हिंदू रितीरीवाजाप्रमाणे करुन दिला होता. लग्नाची सत्यनारायण पुजा होईपर्यंत सासरकडील लोकांनी फिर्यादीस चांगली वागणूक दिली.

दि.१९ जुलै २०२५ पासून फिर्यादी हे सध्या आंधळगाव येथे राहण्यास आहे. दि. २९ फेब्रुवारी २०२५ पासून वरील सर्व आरोपींनी फिर्यादीस तू वडिलाकडून सोन्याचे मंगळसुत्र घेऊन ये तसेच लोकांची कर्ज फेडण्याकरिता माहेरहून पैसे घेवून ये असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला.

फिर्यादीच्या माहेरकडील वडील व अन्य लोक सासरी आले व त्यांनी सासरकडील लोकांना मुलींना का त्रास देता? असे विचारले असता पती अविनाश कोरडे यांनी मला सन २०१७ पासून पोटाचा आजार असल्याने माझी संसार करण्याची मानसिकता राहिली नाही.

तुमच्या मुलीजवळ सांगितलेल्या गोष्टी करा अथवा तुमच्या मुलीला माहेरी घेऊन जावा, असे सांगितले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













