टीम मंगळवेढा टाईम्स ।
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एका विवाहितेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. राचम्मा ऊर्फ सुजाता संतोष पटणे (वय 33) आणि चित्रा संतोष पटणे (वय 6) अशी त्यांची नावे आहेत.
राचम्मा यांचा संतोष पटणे याच्याशी आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले असून, पैकी सहा वर्षांची मुलगी, तर चार वर्षांचा मुलगा होता. राचम्मा आणि चित्रा या दोघी सकाळपासून घरात बराच वेळापासून दिसल्या नव्हत्या. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.
तेव्हा राचम्मा ऊर्फ सुजाता आणि चित्रा यांचा एकत्रित मृतदेह राठोड यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना अढळून आला.याची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे. मृत्यृचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज