टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसलेला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मनोहर मामासोबत दोन साथीदारांविरोधात लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशातच आता मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या आहेत.
कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत एका तरूणाची फसवणूक करण्याचा आरोप मनोहर मामावर आहे. त्याचबरोबर मनोहर मामावर बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपही आहेत.
त्यामुळे करमाळा न्यायालयाने मनोहर मामाला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोहर मामा येत्या 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.
माझ्याकडून मनोहर मामाने जवळपास 40 लाख रूपयांचा रो हाऊस घेतला होता. परंतु माझी कोणतीही कामं झाली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांच्याकडून परत मागितला.
मात्र मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रूपये खर्च झाले आहेत. तु मला ते पैसे परत कर त्याच वेळी तुला मी रो हाऊस परत करेल, असं मनोहर मामा यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, त्यानंतर महेश आटोळे यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती पोलीस ठाण्यात दिली होती. मनोहर मामाने पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप मनोहर मामांनी फेटाळून लावले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज