समाधान फुगारे । टीम मंगळवेढा टाईम्स
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवेढा नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी नागरिकांना मास्क परिधान करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच मास्क न वापरणारें व प्लास्टिक बंदी बद्दल दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.सद्धस्थितीत राज्यातील काही विभागांमध्ये वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनची स्थिती उद्भवू नये यासाठी मंगळवेढा नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.
मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल आजपासून सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ यात्रा,मिरवणूका , मोर्चे यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंदी घातली आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे.जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.
आज तहसिलमध्ये कोरोनासंबंधीत बैठक…
आज सोमवारी दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालयामध्ये कोरोनासंबंधीत बैठक आयोजित केली आहे.मंगळवेढा शहरातील सर्व मंगल कार्यालये मालक, हॉटेल्स चालक, व्यापारी अध्यक्ष व प्रतिनिधी, खासगी शिकवणी वर्ग इत्यादींना तहसिल कार्यालयामध्ये बैठकी साठी उपस्थित राहायचे आहे.
आजपासून कडक कारवाई….
आज पासून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवेढा शहरासाठी मास्क न वापरणारें व प्लास्टिक बंदी बद्दल दंडात्मक कारवाई करावी म्हणून मंगळवेढा नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे नेमणूक केली आहे.
सर्व व्यापारी बांधवांना व शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, शासनाने कोरोना साथीचा प्रतिबंध करण्यासंबंधी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करून नगरपरिषदेस सहकार्य करावे. अन्यथा आपणावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मंगळवेढा नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी दिला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज