mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! लग्नकार्यासाठी गेलेल्या शिक्षकाच्या घरातून चोरट्यांनी ४८ हजाराचा ऐवज केला लंपास

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 10, 2020
in क्राईम, मंगळवेढा
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील एक शिक्षक लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेला असता त्यांच्या घरातून चोरट्यांनी ४८ हजाराचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास येथील बनशंकरी कॉलनीत ही घटना उघडकीस आली.

यातील फिर्यादी रामचंद्र सेवू राठोड (वय ४५,रा बनशंकरी कॉलनी) हे प्राथमिक शिक्षक आहेत. ते सहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुतण्याच्या लग्नासाठी घराला कुलूप लावून मंगळवेढा तालुक्यातीलच बालाजीनगरला गेले होते.

ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १८ हजारांचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, ३० हजारांची रोकड असा ४८ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिराला दुचाकी धडकून दोघे जखमी; वाचा सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्त

समोरून येणाऱ्या वाहनास साईड देत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरास धडकून दुचाकीवरील किरण जानकीराम तिरमले (वय 23) आणि चांगू सोपान उबाळे (वय 17, रा. अंबेजोगाई, जि. बीड, सध्या गोटेवाडी, ता. मोहोळ) हे दोघे जखमी झाले. गोटेवाडी ते सूर्यभान माळी यांच्या शेताकडे दुचाकीवरून जाताना हा अपघात झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

पैशाच्या कारणावरून विवाहितेस मारहाण
पैशाच्या कारणावरून प्रियांका समाधान बनसोडे (वय 26, रा. हत्तीज, ता. बार्शी) या विवाहितेस तिचा नवरा, सासू, सासरे, दीर व नणंद यांनी लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केल्याने तिच्या सर्वांगास मुका मार लागला आहे. त्यामुळे प्रियांका हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अक्‍कलकोट तालुक्‍यातील तोळणूर येथील शरणप्पा ईरप्पा मठपती (वय 24) या तरुणाने राहत्या घरात अज्ञात कारणावरून कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मठपती यास त्रास होऊ लागल्यावर त्याला वडील ईरप्पा मठपती यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

औषध समजून केले विष प्राशन !

खोकल्याचे औषध समजून दैवता दत्तात्रय शिंदे (वय 54, रा. उत्तर कसबा, चौपाड, सोलापूर) या महिलेने विषारी औषध पिले. यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यावर उपचारासाठी मुलगा संदीप शिंदे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
म्हेत्रे वीटभट्टीजवळील विहिरीमध्ये पडून श्रीकांत नारायण गायकवाड (वय 33, रा. विजयलक्ष्मी नगर, सोलापूर) या तरुणाने आत्महत्या केली. गायकवाड याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यावर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तो वर काढून शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.

याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

घरगुती वादातून तरुणास मारहाण

घरगुती वादातून राजेश रायसिंग मैनावाले (वय 30, रा. उत्तर सदर बझार, लष्कर, सोलापूर) या तरुणास नळ बाजार चौक येथे सुभाष मन्सावाले व इतरांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला. जखमी अवस्थेत राजेश यास सीमा बडुरवाले या महिलेने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

ट्रॅक्‍टरची धडक लागून महिलेचा मृत्यू

शेतात काम करताना ट्रॅक्‍टरची धडक लागून डोक्‍यावरून चाक गेल्याने शारदा दऱ्याप्पा मेसे (वय 60, रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) ही महिला गंभीर जखमी होऊन मरण पावली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत शारदा मेसे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चोरीपोलीसमंगळवेढा

संबंधित बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post

नव्या शक्ती कायद्याच्या मसुद्यास मान्यता बलात्काऱ्यांना आता मृत्युदंडच

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..